Alandi : आळंदी शहराला उशिराने होणार पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज – भामा-आसखेड येथील पाणीपुरवठा (Alandi) मुख्य विभागातच विद्युत वाहिनीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने 16 जानेवारी रोजी सकाळपासून गावठाण विभागात पाणीपुरवठा झाला नाही. भामा आसखेड मुख्य विभागातील विद्युत वहिनीमध्ये पहाटे 1 वाजता तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.

Bhosari News: ‘इंद्रायणी थडी’साठी स्टॉल वाटप प्रक्रिया अंतिम टप्प्यात

सकाळी 10 नंतर भामा आसखेड येथून आळंदीला परत पाणी पुरवठा (Alandi) सुरू होईल. त्यानंतर आळंदी शहरात पाणीपुरवठा होईल. याबाबतची माहिती पाणीपुरवठा आधिकारी अक्षय शिरगिरे यांनी दिली. आळंदी शहरात गावठाण विभाग व (आळंदी) हवेली विभाग असा दिवसाआड पाणीपुरवठा चालू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.