Pimpri : नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाण्याचा टँकर

एमपीसी न्यूज –  दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र देहू व आळंदी येथुन पंढरपूर पायी वारीसाठी जाणाऱ्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था तसेच वारकऱ्यांच्या प्रथमोपचारासाठी सुविधा करुण देण्यात आली आहे.

BJP : सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण करत भारताची संपन्नतेकडे वाटचाल – गौरव गौतम

याप्रसंगी  ह.भ.प.विलासराव काटे, माऊली काटे , अर्जुन काटे,विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेचे अध्यक्ष गणेश साहेबराव काटे , उद्योजक संदिप जगताप , उद्योजक गणेश काटे , विशाल काळे , प्रशांत शिंदे उपस्थित होते.  तसेच तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका यांची काल (बुधवारी) नाना काटे यांच्या हस्ते पुजा करुन वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाठवण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.