Pimpri : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवाकार्याचे सहकार्य

एमपीसी न्यूज – विश्व हिंदू परिषदेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पंढरपूरपर्यंत मोफत आरोग्यसेवा आणि औषधोपचाराचा उपक्रम गेल्या सदतीस वर्षांप्रमाणे याही वर्षी (Pimpri) राबविण्यात आला आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री प्रा. संजय मुद्राळे आणि सहमंत्री ॲड. सतीश गोरडे यांनी दिली. सदरहू आरोग्य सेवेचा प्रारंभ पुण्यातून करण्यात आला असून या पथकामध्ये एकूण 10 रुग्णवाहिका, 28 डॉक्टर्स, 24 परिचारिका आणि 80 कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Pimpri : नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाण्याचा टँकर

संत निवृत्तीनाथ पालखी मार्गावर आठ दिवसांपूर्वीच तीन रुग्णवाहिका देऊन आरोग्यसेवा सुरू करण्यात आली आहे. आज पुण्यातून संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी मार्गावर तीन, संत तुकाराममहाराज पालखी मार्गावर तीन आणि डॉक्टरांची ने-आण करण्यासाठी एक असे रुग्णवाहिकांचे शुभारंभ करण्यात आले आहे.‌ पुणे महानगरपालिका अन्न आणि औषध प्रशासन अतिरिक्त आयुक्त श्याम प्रताप पवार यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी आरोग्यपथकात सहभागी झालेल्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि कार्यकर्ते यांना शुभेच्छा देताना श्याम प्रतापवार यांनी, “हा सेवा प्रकल्प वारकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून सहभागी डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी; तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन रुग्णांवर‌ औषधोपचार करताना शासन आणि आरोग्य संघटनेने ठरविलेल्या नियमांचे पालन करावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली.

विश्व हिंदू परिषद हे कार्य गेली 37 वर्षांपासून करीत आहे. हे ईश्वरीय कार्य करण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका आणि कार्यकर्ते काम करीत आहेत. यावेळी प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, किशोर चव्हाण, मनोहर ओक, धनंजय गायकवाड, विजय कांबळे, राजेश कोंढरे यांच्या उपस्थितीत आरोग्य पथकाचा सत्कार करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.