Pune : रेल्वे स्टेशन परिसरात एकाचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या मारुती मंदिरा मागे एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मयत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे इतके आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शरद गायकवाड (वय 34) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Pimpri : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवाकार्याचे सहकार्य

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून अंदाजे 30 ते 35 वर्ष वय असणाऱ्या एका अनोळखी तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी, मयताची ओळख पटू नये यासाठी त्याचा चेहरा विद्रूप केला आहे. बंडगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मधाळे अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.