Pune : भांडारकर संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीवर ऑनलाइन अभ्यासक्रम

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवरायांच्या 350 व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती यावर एक सर्वसमावेशक ऑनलाइन अभ्यासक्रमाची निर्मिती केली असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आज येथे दिली. संपूर्ण मराठी भाषेतील व सोबत इंग्रजीमध्ये उपशीर्षके असलेला सदरचा कोर्स http://www.bharatvidya.in या संकेतस्थळावर सशुल्क उपलब्ध आहे.

याविषयी अधिक माहिती देतांना पटवर्धन म्हणाले की, प्राच्यविद्या आणि भारतीय संशोधन क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी ओळखल्या जाणार्‍या भांडारकर संस्थेमध्ये पुणे, Pune या विषयावर गेली अनेक वर्षे संशोधन सुरु आहे.

या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षक डॉ. केदार फाळके यांनी शिवाजी महाराजांच्या शासन आणि नेतृत्वाच्या कालातीत तत्त्वांद्वारे त्यांची राजनीती आणि राजकीय धोरणे यावर सखोलपणे मार्गदर्शन केले आहे. या कोर्समध्ये प्रामुख्याने महाराजांच्या पुढील 6 पैलूंवर प्रकाश टाकला आहे. त्यामध्ये – प्रशासकीय सुधारणा, दुर्ग आणि जल व्यवस्थापन प्रणाली, लष्करी प्रशासन, राज्याचा पाया, सक्षम नेतृत्व आणि भविष्यवेधी व शाश्‍वत धोरणे आणि परिणाम याचा समावेश आहे.

इतिहासप्रेमी, धोरणकर्ते, शिक्षक, विद्यार्थी अशा प्रत्येकासाठी हा ज्ञानाचा खजिना आहे. सदरचा कोर्स कायमस्वरुपी उपलब्ध असल्याने अभ्यासकांना पाहिजे तेंव्हा शिकता येणार आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने सुरू केलेले http://www.bharatvidya.in हे एक अभिनव ऑनलाइन व्यासपीठ तयार होणार आहे.

भारताचा जीवंत इतिहास, संस्कृती आणि तत्त्वज्ञान याविषयीचे ज्ञान जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्यासपीठ समर्पित असून याद्वारे वेद, महाभारत, उपनिषद, पुरातत्व, दर्शनशास्त्र, कालिदास आणि संस्कृत भाषा यांसारख्या विषयांवर अनेक तज्ञांद्वारे ऑनलाइन अभ्यासक्रम शिकवले जातात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.