Chikhli : आठ महिन्याच्या बाळाचा खून करत आईचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – आईने पोटच्या आट महिन्याच्या मुलाचे नाक तोंड दाबून त्याचा खून करत स्वतःच्या हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हि धक्कादायक घटना मंगळवारी (दि.13) दुपारी साडेचार ते साडे पाचच्या सुमारास चिखली (Chikhli )येथील नेवाळे वस्ती येथे घडली आहे.

Pune : भांडारकर संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीवर ऑनलाइन अभ्यासक्रम

याप्रकरणी पतीने चिखली पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.14) फिर्याद दिली असून पोलिसांनी पत्नी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामावर गेले असताना त्यांची पत्नी, आई, लहाण बहिण व बाळ हे घरी होते. यावेळी पत्नीने त्यांच्या आठ महिन्याच्या बाळाचे नाक- तोंड दाबून त्याचा खून केला. शेवटी तिनेही आपल्या हाताची नस कापून घेत स्वतःला बाथरूममध्ये बंद केले.

घरच्यांनी तिला कसेबसे बाहेर काढत दवाखान्यात दाखल केले. चिखली पोलिसांनी पंचनामा केला असून अद्याप महिलेने एवढे टोकाचो पाऊल का उचलले याचा उलगडा झालेला नाही. चिखली (Chikhli) पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

दोन दिवसांपुर्वीच तीन वर्षाची मुलगी रडत आहे म्हणून सावत्र बापाने तिला थेट भिंतीवर आपटून तिचा खून केला. या घटना हृदय पिळवटून टाकणाऱ्या असल्य़ा तरी एवढा पराकोटीचा राग येतो कुठून असा सवाल उपस्थित होत आहे…. या साऱ्यात जगाची नीटशी जाण नसणारे चिमुकले मात्र या रागाला विनाकारण बळी पडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने रागाच्या भरात कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्या आधी शांत डोक्याने विचार करावा कारण प्रत्येक अडचणीला उपाय हा असतोच.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.