Pune : पुणे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित करू : आमदार रविंद्र धंगेकर

एमपीसी न्यूज – भाजपचे नेते पुणे (Pune) शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक लवकरच जाहीर होईल. अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र अद्यापपर्यंत निवडणुक आयोगामार्फत कोणत्याही प्रकारचा पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही.

Nigdi : चष्मा दिला नाही म्हणून तरुणाला बेदम मारहाण

त्याच दरम्यान भाजपचे नेते सुनील देवधर हे पुणे लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा काल सोशल मीडियावर रंगली होती.या चर्चेला काही तास होत नाही. तोवर आज सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा निवडणुक लढविणार अशी चर्चा पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या चर्चेवर कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,लोकशाहीमध्ये कोणालाही कुठे ही निवडणुक लढविण्याचा अधिकार आहे.तर सध्या सोशल मीडियावर पुणे लोकसभा निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लढविणार असल्याची चर्चा सुरु असून त्याबद्दल नरेंद्र मोदी यांच स्वागत करतो.

पण मागील 9 वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार पाहिल्यावर एकच दिसून येते की,आपल्या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे जात आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यासह अनेक प्रश्नांनी देशातील जनता त्रस्त आहे.त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे.

तर देशातील विविध संघटना एकत्रित येत इंडिया हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. त्याला निश्चित यश येणार आहे.त्या बैठकीत पुणे लोकसभा कोणत्या पक्षाला सोडायची याबाबत निश्चित चर्चा होणार आहे.त्यामध्ये जो निर्णय घेतला जाईल.तो मान्य असणार असून आमचा उमेदवारी निश्चित विजयी होईल.

त्याचबरोबर आमच्या नेतृत्त्वाने मला पुणे (Pune)  लोकसभा निवडणुक लढविण्याची संधी दिली.तर निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नसल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.