Pune : निवडणुकीत काँग्रेसला बहुमताने निवडून आणून भाजपला आपली जागा दाखवू – रवींद्र धंगेकर

एमपीसी न्यूज –  काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी ( Pune)  महाराष्ट्रातील  उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली. ,यात  पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे आता पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे.

माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह अन्य काही जणांनी लोकसभेसाठी इच्छुक होते.मात्रभाजपने लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ  यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता काँग्रेसकडून धंगेकर यांचे नाव पुढे येण्याची शक्यता होती. कसबा विधानसभेच्या भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर हे काँग्रेसच्या तिकिटावर कसब्यातून विजयी झाले होते. भाजपचे उमेदवार स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचा धंगेकर यांनी पराभव केला होता. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसब्यात धंगेकर यांचा विजय काँग्रेसला प्रोत्साहन देणारा ठरला.

Maval : सात वर्षीय मुलीच्या अपहरण, खून प्रकरणी आज अंतिम सुनावणी

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर  झाल्यानंतर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा आणि सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे. मी पुणेकरांचा उमेदवार आहे. त्यामुळे याआधी मला पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे. आता याही निवडणुकीत पुणेकर मला भरभरून आशीर्वाद देतील, याची खात्री आहे.

वाहतुकीपासून प्रदूषणापर्यंत अमली पदार्थांपासून वाढत्या गुन्हेगारीपर्यंत अनेक समस्या पुणेकरांसमोर उभ्या आहेत. महागाई, बेरोजगारी या समस्या तर दिवसेंदिवस वाढत आहेत. पण, भाजपने या प्रश्नांबद्दल काहीही केले नाही. गेली 10 वर्षे इथे भाजपचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी पुणेकरांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवला नाही. एकूणच राज्यात आणि देशात भाजपच्या कारभाराला, फसवणुकीला जनता कंटाळली आहे. ती या निवडणुकीत काँग्रेसला बहुमताने निवडून आणून भाजपला आपली जागा दाखवून देईल, याची आम्हाला गॅरंटी ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.