Nigdi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पामागील एलईडी लाईट्सची दुरुस्ती

एमपीसी न्यूज – निगडीतील ‘भक्ती-शक्ती’ उड्डाणपुलाखालील जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज शिल्पामागील बंद अवस्थेत असणा-या एलईडी लाईटसची महापालिका प्रशासनाच्या वतीने दुरुस्ती करण्यात आली.

Pune : पुणे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित करू : आमदार रविंद्र धंगेकर

निगडीतील ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) या उड्डाणपुला खालून जाणाऱ्या मार्गावरील जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या (प्रोफाईल कटिंग) शिल्पाच्या मागे असणा-या एलईडी लाईट या अनेक दिवसांपासून बंद होत्या.

त्यामुळे त्या शिल्पाच्या शोभेस बाधा येत असल्यामुळे एलईडी लाईटसची दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. अखेर शिल्पामागील एलईडी लाईटची दुरुस्ती करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.