Sangvi : कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराला वयस्कर दाम्पत्याकडून धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – उच्च न्यायालयाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत असताना वयस्क दाम्पत्याने तहसीलदारालाच धक्काबुक्की केली आहे. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.31) गुन्हा दाखल केला आहे.

Nigdi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पामागील एलईडी लाईट्सची दुरुस्ती

याप्रकरणी पिंपरीचे नायब तहसीलदार प्रवीण किशन ढमाले (वय 47) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ऋषिकेश रविकुमार राक्षे (रा.पिंपळे सौदागर) व त्याची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुंबई उच्च न्यायालयाकडील रिट पिटीशन व जिल्हादंडअधिकारी यांच्या आदेशानुसार मयुरेश साई निसर्ग पार्क को. ऑपरेटीव्ह हाऊसींग सोसायटी येथील रो हाऊस नंबर 63 वर ताबा घेत असताना आरोपी यांनी पिर्यादी व इतर सराकारी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. तसेच शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून सांगवी (Sangvi) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.