Pimple Gurav : वेगात जाणारी रिक्षा पलटली, रिक्षा चालका शेजारी बसलेल्या प्रवाश्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रिक्षाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे (Pimpri)व वेगात धूम स्टाईलने रिक्षा चालवणे हे पिंपरी-चिंचवड शहरात दिसणारे रोजचे चित्र आहे. रिक्षा चालकांच्या या मनमानीमुळे एका तरुणाचा बळी गेला आहे.

स्वाताःच्या सीटवर आणखी एक प्रवासी बसवून वाहतुकींच्या नियमांकडे दुर्लक्ष करत रिक्षा वेगात चालवल्याने रिक्षाचा अपघात होऊन रिक्षा थेट पलटी झाली. या अपघातात रिक्षात चालका शेजारी अगदी काठावर बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.हा अपघात 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी पिंपळे गुरव-पुणे रोडवर झाला आहे.

Nigdi: शस्त्रासह तडीपार आरोपीला अटक

याप्रकरणी पोलीसांनीच बुधवारी (दि.13) (Pimpri)सांगवीपोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून रिक्षा चालक सुजल राजेश केदारी (वय 19 रा. दापोडी) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.यात सागर सुरेंद्र साथी (वय 26 रा. दापोडी) याचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यातील रिक्षा रोडवर बेदरकारपणे अतिशय वेगाने चालवत होता. यावेळी त्याने सागरला त्याच्या सीटवर कडेला बसवले होते. यावेळी रिक्षा वेगात असल्याने ती पलटली. अपघातात सागर खाली पडला व तो गंभीर जखमी झाला यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र रिक्षा चालकांच्या या बेशिस्तीला आळा कधी बसणार हा सवाल उपस्थित होत आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.