Pune : पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हाधिकारी दिल्लीला रवाना

एमपीसी न्यूज – उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर (Pune) पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे आज दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानेच पुणे लोकसभा पोटनिवडणुक होऊ दिली नाही, असा आरोप विरोधी पक्षांतर्फे करण्यात आला.

भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळापासून रिक्त असलेली पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. त्यानंतर तातडीने दुपारीच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख दिल्ली येथे रवाना झाले. जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक अधिकारीदेखील असतात. त्यामुळे डॉ. देशमुख हे तातडीने दिल्लीला गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात खमंग चर्चा सुरू झाली.

Pimple Gurav : घराची चावी शुजरॅकमध्ये ठेवणे पडले महागात, घरातून दागिने चोरीला

पोटनिवडणूक न घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची कृती बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा दावा करणारी आणि पोटनिवडणुकीच्या आदेशाची मागणी करणारी (Pune) याचिका पुणेस्थित सुघोष जोशी यांनी केली होती. त्यावर सुनावणी होऊन पोटनिवडणूक न घेण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाने फटकारत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.