Pimple Gurav : घराची चावी शुजरॅकमध्ये ठेवणे पडले महागात, घरातून दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – सहसा बरेचजण सोयीसाठी घराची (Pimple Gurav)चावी चप्पल स्टँड किंवा शूज मध्ये घराची चावी ठेवतात. मात्र एका महिलेला शुजमध्ये ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. यावेळी चोरांनी याच गोष्टीचा गैरफायदा घेत चावीने घर उघडून घरातील दागीने चोरून नेले आहेत.

हा सारा प्रकार बुधवारी (दि.13) सकाळी आट ते दुपारी दोन या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला आहे.

Pune : पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार, आता उमेदवारांची उत्सुकता

शुभम संपत देशमुख (वय 28 रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Pimple Gurav)यांच्या पत्नी या घरातून बाहेर पडताना घराला लॉक लावून त्यांनी चावी शूज रॅक वरील शूजमध्ये ठेवली. चोराने याच गोष्टीचा फायदा घेत चावीने घर उघडून घऱातील कपाटातून 98 हजार रुपयांचे 21 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले आहेत. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.