Vasant More : मी 100 टक्के पुणे लोकसभा निवडणूक लढविणार –  वसंत मोरे 

एमपीसी न्यूज – मी 100 टक्के पुणे लोकसभा निवडणूक असल्याची घोषणा (Vasant More) मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी आज केली. निवडणुकीच्या रिंगणात असणार असून ‘मी एकला चलो रे’च्या भूमिकेवर ठाम आहे, असे विधान वसंत मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. मनसे पक्ष सोडल्यानंतर वसंत मोरे हे चर्चेत आहेत. पुणे लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेतली. पण, अपेक्षित प्रतिसाद दिसून आला नाही.

महायुतीने पुण्याची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर केली. त्यांचा प्रचारदेखील सुरू झाला आहे. भाजपच्या नेत्यांकडून पुणे लोकसभेची निवडणूक ही एकतर्फी होणार असल्याची वक्तव्ये समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मोरे यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘..तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते, बघतोच मी…’, असे म्हणत मोरे यांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे.

मागील पाच वर्षांच्या काळात भाजपने पुणे शहराचा खेळखंडोबा करून ठेवला आहे.

Pune : निष्ठावंतांना संधी द्या, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक  

तरीदेखील कोणी म्हणत असेल की, ही निवडणूक एकतर्फी होणार, तर त्या व्यक्तींना एकच सांगू इच्छितो की, जोवर पुणे शहरात वसंत मोरे आहे, तोपर्यंत ही निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही. मी कोणत्याही पक्षात जाण्यासाठी मनसे पक्ष सोडला नाही. १०० टक्के वसंत मोरे हा निवडणुकीच्या रिंगणात असणार असून ‘मी एकला चलो रे’च्या भूमिकेवर ठाम आहे.

मनसेचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करणारे वसंत मोरे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याच्या आशा धूसर झाल्या असतानाच समाजमाध्यमातून मोरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली (Vasant More) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.