Nigdi : चष्मा दिला नाही म्हणून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – चष्मा मागितला असता दिला नाही म्हणून दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार निगडी (Nigdi) ओटास्किम येथे गुरुवारी (दि.31) दुपारी घडली.

Alandi : भांडणे मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला

याप्रकरणी निगडी पोलिसांनी हारनमसिंग जुन्नी (वय 28 रा. निगडी) व अमोल सूर्यवंशी (वय 23 रा.चिखली) यांना अटक केली आहे.व्यंकटेश रामदास लष्करे (वय 17 रा.निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुर्गामाता मंदिरात चष्मा घालून मोबाईल बघत होते. यावेळी आरोपी आले व त्यांनी फिर्यादीला चष्मा मागितला. फिर्यादी ने चष्मा देण्यास नकार दिला असता आरोपींनी मारहाण व शिवीगाळ केली. बांबूने पायावर मारल्याने उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.