Pimpri : मुख्यमंत्री बदलणार का? अजित पवार म्हणाले…!

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांच्या आपत्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. (Pimpri)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होतील आणि सप्टेंबर महिन्यात नेतृत्व बदल होईल असा दावा विरोधकांकडून केला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले. सप्टेंबर महिन्यात कोणताही बदल होणार नसून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Pune : संमोहन करणारे ५० कोटी रुपयांचे मेथाक्‍वालोन पुण्यात जप्त

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या 9 आमदारांसह मंत्रिमंडळात सहभागी झाले. अजितदादा सरकारमध्ये आल्याने मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचा गट नाराज असल्याचे बोलले जाऊ लागले. सप्टेंबरमध्ये ‘भाई जाणार आणि दादा’ येणार असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर आता अजित पवार यांनीच स्पष्ट भाष्य केले आहे.

राज्यात सप्टेंबर महिन्यात बदल होईल असे काहीजण म्हणतात. मात्र, बदल होणार नाही. 200 पेक्षा जास्त आमदारांचा या सरकारला पाठिंबा आहे. एवढ्या आमदारांचे पाठिंबा असणारे सरकार मागील 40 वर्षांत कधी पाहिले नव्हते. काँग्रेसनंतर पहिल्यांदाच एवढ्या आमदारांचा पाठींबा असलेले हे एकमेव सरकार आहे.

त्यामुळे सरकार आपला उर्वरित कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करत मी कोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करत नाही. आम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन काम करत असल्याचे पवार यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.