Kurali : क्रेन मधील जॉब डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंपनीमधील जड व मोठे जॉब ट्रेनने लोड व अन लोड करत असताना जॉब डोक्यात पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 26 ऑगस्ट रोजी कुरळी (Kurali) येथील स्पॅकॉर्न इंजिनीअर्स या कंपनीत घडला होता.

Chinchwad : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ढोल-ताशा पथकांची अनोखी मानवंदना

सुमित रामभवन मौर्य असे मयत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सुरज देवराम पानसरे (वय 25 बहूळ खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार क्रेन चालक गुडहूकुमार यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हा क्रीम चालक असून तो कंपनीतील मोठे जॉब क्रेन द्वारे लोड व अन लोड करत होता. यावेळी सुमित हा त्याच्याबरोबर कामगार म्हणून आला होता. जॉब लोड अन लोड करत असताना आरोपी आणि क्रेन हयगयीने चालवले त्यामुळे क्रेनला लावलेला जॉब निघून क्रेनची मोठी साखळी व हुक हे काम करत असलेल्या सुमित याच्या डोक्याला लागले.

यात सुमित गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी भोसरी येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान 6 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. यावरून क्रेन चालक यादव याच्या विरोधात महागाई एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.