Chinchwad : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ढोल-ताशा पथकांची अनोखी मानवंदना

भक्ती-शक्ती येथे होणार 350 ढोल, ताशांचे वादन, 350 भगवे ध्वजही फडकणार

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त अखिल पिंपरी चिंचवड शिवजयंती समन्वय समिती, ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंचवड विभाग, तसेच पिंपरी चिंचवड (Chinchwad) शहर व मावळ तालुका यातील ढोल-ताशा वाद्य पथके यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे.

Dehuroad : जुन्या भांडणाच्या रागातून बहिणीच्या कुटुंबाकडून भावाच्या कुटुंबाला मारहाण

350 व्या वर्षानिमित्त 350 ढोल, 350 ताशा वादन आणि 350 ध्वज नाचवून शिववंदन, वादन आणि शिवस्तुतीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 16) सायंकाळी पाच वाजता भक्ती-शक्ती शिल्प समूह, निगडी येथे होणार आहे.

अखिल पिंपरी चिंचवड शिवजयंती समन्वय समितीचे प्रमुख संदीप जाधव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी ढोल ताशा महासंघ पिंपरी-चिंचवडचे विशाल मानकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवडचे जयंत जाधव, शिवजयंती समन्वय समितीचे कुणाल साठे, माजी नगरसेवक अमित गावडे, शीतल शिंदे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती उदयन महाराज भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे प्रमुख पाहून म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेते व पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे, नुकताच प्रदर्शित झालेल्या मराठी ‘सुभेदार’ या चित्रपटाचे सर्व कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत.

ढोल, ताशांचे वादन सुमारे 35 मिनिटे होणार आहे. भक्ती-शक्ती शिल्प समूहाला प्रदक्षिणा घालून ढोल-ताशा वाजवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम सुरु होईल. मान्यवरांचे सत्कार आणि भाषणे झाल्यानंतर प्रत्यक्ष ढोल-ताशा वादनाला सुरुवात होईल.

ढोल-तशा पथकातील वादक आणि उपस्थितांच्या आरोग्याची काळजी आयोजकांकडून घेण्यात येणार आहे. कार्यक्रम झाल्यानंतर वादन करणारे वादक स्वतः परिसरात स्वच्छता मोहीम राबवणार आहेत. ढोल-ताशा वादन हे कर्णकर्कश वाटणार नाही, याची आयोजकांनी खबरदारी घेतली आहे. कार्यक्रमासाठी येणारे पाहुणे, वादक आणि नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी एकूण सहा ठिकाणी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. सुमारे 40 स्वयंसेवक पार्किंगचे नियोजन करणार आहेत.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप जाधव, पराग ठाकूर, विशाल मानकर, महेश्वर मराठे, अतुल दौडकर, सचिन ढोबळे, कुणाल साठे, योगेश सासवडे हे प्रयत्न करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.