Dehuroad : जुन्या भांडणाच्या रागातून बहिणीच्या कुटुंबाकडून भावाच्या कुटुंबाला मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा राग मनात धरून बहिणीने तिच्या कुटुंबासह मिळून भावाच्या कुटुंबाला लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. याप्रकरणी देहूरोड (Dehuroad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.11)कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या मागे घडली.

Nigdi : निगडीतून एक लाख रुपयांचा गांजा जप्त, एकाला अटक

याप्रकरणी बाळासाहेब जयाराम धुतडमल (वय 60 देहूरोड) यांनी मंगळवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोन महिला आरोपी व विजय रामदास नवगिरे वैभव राज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाचा राग धरून फिर्यादी यांची बहीण त्यांची मुलगी व मुलगा यांनी लाकडी दांडके हातात घेऊन फिर्यादीला मारण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांचा मुलगा मध्ये पडला असता त्याला देखील आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केले. फिर्यादीच्या पत्नीला ही लाथा बुक्क्याने मारहाण करण्यात आली. यावरून देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.