Nigdi : निगडीतून एक लाख रुपयांचा गांजा जप्त, एकाला अटक

एमपीसी न्यूज – निगडी(Nigdi) येथील पवळे पुलाजवळून आहेत पोलिसांनी तब्बल एक लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी ( दि.11)संध्याकाळी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.

PCMC : शहरातील 23 समाज मंदिरांमध्ये अभ्यासिका

अंकुश कृष्णा साळवे (वय 67 रा.देहूरोड) असे अटक आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार विकास घोडके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पुलाच्या अडोशाला गांजा घेऊन थांबले होते पोलिसांना याची खबर लागतात पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख तीन हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा चार किलो १३० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.

पुण्यामध्ये वापरलेला बारा हजार रुपयांचा फोन असा एकूण एक लाख पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक आरोपी हा गांजा विक्रीच्या इरादांनी आला होता त्याने विकासाच्या कडून हा गांजा घेतल्याचे कबूल केले आहे निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.