Nigdi : महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी निगडी (Nigdi) गावठाण येथे घडली.

PCMC : शहरातील 23 समाज मंदिरांमध्ये अभ्यासिका

अश्‍विनी ज्योतिराम इलगे (वय 35, रा. आगळे निवास, दत्त मंदिराजवळ, निगडी गावठाण) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांनी मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांनी अश्‍विनी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.