PCMC : शहरातील 23 समाज मंदिरांमध्ये अभ्यासिका

एमपीसी न्यूज – शहरातील महापालिकेच्या (PCMC) हद्दीतील घोषित आणि अघोषित अशा 95 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमधील 23 समाज मंदिरामध्ये नवी दिशा-सर्वांगीण विकासा अंतर्गत अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. या खर्चाला स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

Bhosari : मोबाईलवर ॲप डाऊनलोड करायला सांगत क्रेडिट कार्डद्वारे दहा हजार रुपयांची फसवणूक

महापालिकेच्या हद्दीमध्ये घोषित आणि अघोषित अशा 95 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्यांमध्ये सुमारे 5 लाख लोकसंख्या आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये 23 समाजमंदिर महापालिकेने उभारलेली आहेत. झोपडपट्टीतील समाज मंदिराचा वापर हा या विद्यार्थ्यां व युवकांच्या विकासासाठी करावा त्यासाठी अभ्यासिकामध्ये विविध सुविधा पुरविण्यात येणार आहे.

प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना सन 2023-24 साठी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बालभारती यांच्याकडून थेट पद्धतीने शिष्यवृत्ती मार्गदर्शिका पुस्तके खरेदी, प्रभाग क्र. 10 मधील औद्योगिक परिसरातील रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार करण्यास, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत वाहन चालक कर्मचारी नियुक्त करणे, स्वामी समर्थ क्रीडांगण परिसरात रायफल शूटिंगसाठी स्थापत्य विषयक कामे करण्यास तसेच शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 आयोजित करण्यात व त्यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.