Nigdi : मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे सांगत महिलांना फसवणाऱ्या ठगास अटक

एमपीसी न्यूज – उद्योजक मालपाणी कुटुंबातील सदस्य असल्याचे (Nigdi )सांगून एक तरुण महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करत होता. त्याला निगडी पोलिसांनी हडपसर परिसरातून अटक केली आहे.

सुरज लक्ष्मण परमार उर्फ सुरज जैन उर्फ सुरेश भिवशी कदम उर्फ (Nigdi )द्रीश मालपाणी (वय 28, रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेला सुरज जैन या नावाने सोशल मिडीयावर रिक्वेस्ट पाठवून रिक्वेस्ट पाठवणारा व्यक्ती हा संगमनेर येथील मालपाणी कुटुंबातील सदस्य असल्याचे भासवले. महिलेशी मैत्री करून तिला बाहेर भेटायला बोलावून तिच्यासोबत त्याने फोटो काढले. त्यानंतर ते फोटो मॉर्फ करून सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडून 34 तोळे सोन्याचे दागिने घेतले. आणखी दागिने देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने महिलेचे सोशल मिडिया अकाउंट स्वताच्या फोनमध्ये सुरु करून त्यावरून मॉर्फ केलेले फोटो अपलोड करत महिलेची बदनामी केली. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी आरोपीने महिलेच्या नावाने वापरलेल्या सोशल मिडीया अकाउंटचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी सय्यदनगर, हडपसर येथे वास्तव्यास असल्याचे समजल्यानंतर निगडी पोलिसांनी तीन दिवस सय्यदनगर येथे सापळा लाऊन आरोपीला अटक केली. त्याने निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पिडीत महिलेकडून घेतलेले दागिने त्याच्या मैत्रिणीच्या नावाने विकले होते. विकलेले 34 तोळे सोन्याचे दागिने आणि पिडीत महिलेचे मॉर्फ केलेले फोटो पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केले.

अनेक महिलांना लाखोंचा गंडा

आरोपी सुरज परमार याने त्याचे नाव द्रीश मालपाणी आहे, असे भासवले. तसेच तो संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाच्या कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगून नवी मुंबई येथील एका महिलेची त्याने तब्बल 93 लाख रुपयांची फसवणूक केली. त्याबाबत नवी मुंबई मधील तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

आईलाही आत्महत्या करण्यास केले प्रवृत्त

 

Bhosari : भोसरीत साकारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘‘बैलगाडा शर्यत शिल्प’’

आरोपी सुरज परमार हा अनाथ आहे. त्याला सोलापूर येथील एका महिलेने दत्तक घेतले होते. सुरज याने त्याला दत्तक घेणाऱ्या आईचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी सन 2019 मध्ये स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद आहे.

फसवणूक झाली असल्यास पुढे या

आरोपीने फेसबुक, इन्स्टाग्राम व इतर सोशल मिडियाद्वारे अनेक महिलांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मालपाणी कुटुंबाचा सदस्य आहे, असे सांगून फसवणूक केली असल्यास महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी. अशा महिलांनी निगडी पोलिसांशी संपर्क करावा. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) तेजस्विनी कदम, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक महादेव यलमार, पोलीस अंमलदार भगवान नागरगोजे, सुधाकर अवताडे, शिवाजी नागरगोजे, सिद्राम बाबा, भूपेंद्र चौधरी, राहुल गायकवाड, विनोद होनमाने, दत्तात्रय शिंदे, तुषार गेंगजे, विनायक मराठे, सुनील पवार, नूतन कोंडे यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.