Shell Pimpalgaon: गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – गांजा विकणाऱ्या एकास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक (Shell Pimpalgaon)केली. त्याच्याकडून दोन किलो 775 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 1) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे करण्यात आली.

भरत दशरथ वाघमारे (वय 45, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड) असे अटक केलेल्या(Shell Pimpalgaon) व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधीर दांगट यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chakan : काळुस येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत वाघमारे याने गांजा विक्रीसाठी बाळगला. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख 38 हजार 750 रुपये किमतीचा दोन किलो 775 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.