Khed : पत्नीला मेसेज केल्याचा जाब विचारत तरुणाला मारहाण
एमपीसी न्यूज – माझ्या बायकोला मेसेज का करतो, असे म्हणत एका तरुणाला दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 30) सकाळी खेड (Khed) तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे घडली.
Nigdi : राहत्या घरात गळफास घेत तरुणाने संपवली जीवनयात्रा
बिनतुगलक मजीद शेख (वय 40, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन रामदास कराळे, त्याचा मित्र प्रमोद उर्फ भावड्या पंडित कदम (दोघे रा. शेल पिंपळगाव, त. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन याने फिर्यादी यांच्या मुलाला, ‘तू माझ्या बायकोला मेसेज का करतो’ असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रमोद याने फिर्यादी यांच्या मुलाला फरशीच्या तुकड्याने मारून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला जीवे ठार मारून नदीत फेकून देण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.