Wold Cup 2023 : आजपासून वर्ल्डकप चा थरार 

एमपीसी न्यूज – क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच (Wold Cup 2023) वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरुवात होत असून. जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी पुढील दीड महिना अखंड मनोरंजनाची मेजवानी घेवून आला आहे. 

5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत भारतामध्ये आयोजिलेल्या या विश्वचषकात कोणता संघ दमदार कामगिरी करणार, कोणता संघ लौकिकाला साजेशी खेळी करणार, कोणता संघ आपल्या चाहत्यांना निराश करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तर जगातील उत्तम फलंदाजी आणि दर्जेदार गोलंदाजीचा थरारही पाहायला मिळणार आहे. जगभरातील दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातुन आर्थिक उलाढालही तेवढीच होणार आहे.
गतविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार असून 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे (Wold Cup 2023) या स्पर्धेतला अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारतासह, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या संघांना प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड , बांगलादेश या संघांना कमी लेखण्याची चूक कोणताही संघ करणार नाही.
 भारत अणि पाकिस्तान यांच्यातही सामने होणार असून यामध्ये कोणता संघ वरचढ ठरेल हे ही पाहणे रंजक ठरणार आहे.8 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा पहिला सामना चेन्नई येथे होणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान अशी लढत दिल्ली येथे होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये 14 ऑक्टोबर (Wold Cup 2023) रोजी अहमदाबाद येथे थरार पाहायला मिळणार आहे.
9 ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश he संघ पुणे येथे एकमेकांशी भिडणार असून, 22 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना धरमशाला येथे खेळला जाणार आहे . 29 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड सामना लखनऊ येथे होणार आहे. 2 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध श्रीलंका अशी टक्कर मुंबईत होईल. 5 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका असा सामना कोलकत्ता येथे रंगणार आहे. भारताचा साखळी सामन्यातील शेवटचा सामना नेदरलँड विरुद्ध खेळवला जाईल. हा सामना 12 नोव्हेंबर रोजी बंगलोर येथे होणार आहे.
विश्वचषकातला पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी कलकत्ता येथे होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलातील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगणार आहे.
या विश्वचषकामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांच्यासह भारताला दावेदार मानण्यात येत आहे. तर भारताने नुकतेच झालेले आशिया चषक जिंकले आहे. तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेली मालिकाही जिंकली आहे.  विश्वचषक मायदेशात असल्यामुळे यावेळी विश्वचषकात भारताचे पारडे जड मानले जात आहे.हे सर्व सामने Disney +hotstar या मोबाईल app वर मोफत पाहायला मिळणार असून star sport network वर देखील पाहायला (Wold Cup 2023) मिळणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.