World cup 2023 : वर्ल्डकप मध्ये भारताची विजयी सलामी; ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय

एमपीसी न्यूज-  वर्ल्ड कपच्या रोमांचाला सुरुवात झाली असून हळूहळू वर्ल्ड कप (World cup 2023) पुढे सरकताना स्पर्धेला रंगत चढताना पाहायला मिळते . वर्ल्ड कपच्या पहिल्या टप्प्यातील शेवटच्या सामन्यात काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात थरार अनुभवायला मिळाला.

NCP Hearing : आज होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी

चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर मीचल मार्श याला जसप्रीत बुमराहने स्लीपमध्ये झेलबाद केले . विराट कोहली ने स्लिप मध्ये त्याचा अप्रतिम झेल पकडला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर 41 आणि  स्टीव्ह स्मिथ 46 यांनी संघाचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी मिळून अर्धशतकीय भागीदारी रचली.

यावेळी कुलदीप यादव ने डेविड वॉर्नरला स्वतःच्याच गोलंदाजीवर कॉटन बोल्ड केले. फिरकीला साथ मिळत असताना रवींद्र जडेजा आपल्या फिरकीची जादू कायम ठेवत सेट फलंदाज स्टीव्ह स्मिथचा त्रिफळा उडवला. तर लाबुषण याला के एल राहुल कडे झेलबाद केले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कोणालाही खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू दिले नाही.

शेवटच्या षटकांमध्ये मीचल स्टार्क याने अप्रतिम फलंदाजी करताना संघासाठी 28 धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव सर्वबाद 199 धावावर आटोपला. यावेळी भारतीय फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 200 धावांचे लक्ष्य गाठताना भारताला

तथापि, भारताच्या फलंदाजीची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. भारताचे पहिले तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. हेजलूड, म्युचल स्टार्क यांनी पहिल्या पाच षटकांच्या आत 3 गडी बाद केल्याने भारतावर दबाव वाढला. 2 धावा 3 बाद अशी दयनीय स्थिती भारताची झाली. ऑस्ट्रेलियालाने दिलेले 199 धावांचे लक्ष्य आता मोठे वाटू लागले.

यामध्ये विराट कोहली 12 धावांवर  असताना मीचल मार्श याने त्याचा झेल सोडला, त्याला (World cup 2023) जीवनदान मिळाले. या संधीचा फायदा घेत विराट कोहलीने संयमी फलंदाजी करत सामन्याचे चित्र बदलले. त्याला के एल राहुल ने मोलाची साथ दिली. विराट कोहली 84 धावा काढून बाद झाला. या दोघांनी मिळून165 धावांची भागीदारी रचली. आणि भारताचा विजय सुखर केला.

त्यानंतर शेवटच्या क्षणी हार्दिक पंड्याला सोबत घेऊन राहुलने तुफान फटके बाजी करत भारताला विजय मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाच्या वतीने हेजलउड याने 3 बळी मिळवले, तर मीचल स्टार्क याने 1 गडी टिपला. सुरुवातीच्या सामन्यात संकटमय परिस्थितीत भारताच्या गोलंदाजी आणि फलंदाजांची परीक्षा पाहायला मिळाली .

या परीक्षेत भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी उत्तीर्ण झाल्याने भारताचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. हा सामना जिंकत भारताने वर्ल्ड कपच्या प्रवासाला विजयाने सुरुवात केली आहे. पुढचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध 11 ऑक्टोबरला होणार आहे. तर 14 तारखेला भारत आणि पाकिस्तान हे प्रतिद्वंदी अहमदाबाद येथे 14 ऑक्टोबरला भिडणार (World cup 2023)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.