Pune : चौथ्या मजल्यावरून उडी मारलेल्या तरुणाला पोलिसांनी वेळीच झेलत दिले जिवनदान  

एमपीसी न्यूज – आंबेगाव पठार परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या (Pune) मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेपाळी तरुणाचे प्राण भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले.

World cup 2023 : वर्ल्डकप मध्ये भारताची विजयी सलामी; ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय

हा सर्व प्रकार गुरुवारी (दि.5) सकाळी नऊ वाजता घडला. या घटनेत तरुणाच्या हात आणि पायाला किरकोळ मार लागला आहे. गुरुवारी अचानक तो एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चढला. त्यामुळे तेथील रहिवाशांना माझ्याशी संपर्क साधला. मी त्यांना पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल करण्यास सांगितले तसेच मी सुटीवर असतानाही एका अंमलदारांसह तेथे धाव घेतली.

दरम्यान, अग्निशमन दलाला   ही पाचारण करण्यात आले होते. मात्र अग्निशमन दलाची गाडी येताच तो उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला. अग्निशमन दलाचे जवान जाळी पसरवेपर्यंत त्याने उडी मारली.

त्यामुळे आम्ही हाताची जाळी करून त्याला खाली पडण्यापासून वाचवले. पोलिसांची कर्तव्य तत्परता आणि प्रसंगावधान लक्षात घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी म्हणून ऐश्वर्य कट्ट्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात (Pune) आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.