NCP Hearing : आज होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी

एमपीसी न्यूज –  जुलै महिन्यामध्ये अजित पवार यांनी(NCP Hearing ) घेतलेल्या बंडखोरीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातील आणि चिन्हासंदर्भातील लढाई ही निवडणूक आयोगात सुरू आहे. या प्रकरणाची एक सुनावणी पार पडली असून आज पुन्हा निवडणूक आयोगात दुसऱ्यांदा सुनावणी पार पडणार आहे.

Tathavade : गॅस टॅंकरच्या भीषण आगीत टेम्पोसह तीन स्कूल बस खाक

मागील आठवड्यात शुक्रवारी (दि. 06 ऑक्टोबर) निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत आणि निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी पार पडली. यावेळी युक्तीवाद करताना शरद पवार गटाने हुकूमशाही करत पक्ष चालवला, शरद पवार हे कोणाचेही मत विचारात न घेता परस्पर नियुक्त्या करून त्याबाबतचे पत्र काढत होते, असे आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आले.

तर, शरद पवार गटाने पक्षाचे चिन्ह गोठवू नये, अशी मागणी निवडणूक आयोगासमोर केली. ज्यानंतर आज पुन्हा एकदा या ( NCP Hearing ) प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने सर्वांचे लक्ष त्या सुनावणीकडे लागून राहिले आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.