Tathavade Fire News : गॅस टॅंकरच्या भीषण आगीत टेम्पोसह तीन स्कूल बस खाक

गॅस सिलेंडरचे सलग तीन ते चार स्फोट

एमपीसी न्यूज – गॅस सिलेंडरचे सलग तीन ते चार स्फोट झाले. स्फोटामुळे ( Tathavade ) आगीचे लोळ आणि धुराचे लोट उठले. यात एका टेम्पोसह तीन स्कूल बस जळून खाक झाल्या. ही घटना मुंबई- बेंगळुरू महामार्गावर ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ रविवारी (दि. 8) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली.

जेएसपीएम महाविद्यालयाजवळील मोकळ्या जागेत गॅस सिलेंडर असलेला एक टेम्पो होता. त्यावेळी काही सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे तेथील तीन स्कूल बसने पेट घेतला. तसेच टेम्पो ही खाक झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Today’s Horoscope 09 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

अग्निशमन विभागाला रात्री 11.04 वाजता माहिती मिळाली. पिंपरी, थेरगाव, प्राधिकरण, राहटणी, चिखली, भोसरी, तळवडे, हिंजवडी एमआयडीसी आणि पीएमआरडीए येथील बंब घटनास्थळी दाखल झाले.

तिरूपती करियरचे 21 टन क्षमतेच्या प्रोपिलीन गॅस असलेल्या बुलेट (गॅस टँकर) मधून अवैधरित्या ( Tathavade )  गॅसचा भरणा घरगुती 14.2 किलो आणि कमर्शियल सिलेंडरमध्ये करण्यात येत असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये गॅसची गळती झाल्यानंतर आग लागली असावी. त्यानंतर भितीपोटी कार्यरत कर्मचारी घटनास्थळा पासून पळून गेले असावेत. त्यामुळे घटनास्थळी कोणीही जखमी अवस्थेत आढळून आले नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

घटनास्थळी एकूण 27 सिलेंडर आढळून आले. मधरात्री दीड वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान परिसरातील सोसायट्यांमधील लहान मुले व महिलांमध्ये स्फोटाच्या आवाजाने घबराट ( Tathavade ) पसरली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.