Tathavade : ब्लॉसम पब्लिक स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज –  जे. एस. पी. एम. संचलित ताथवडे येथील (Tathavade)  ब्लॉसम पब्लिक स्कूलमध्ये तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन  उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाचे उद्घाटन एनडीएचे  लेफ्टनंट कर्नल पी. एस. राणावत यांच्या हस्ते करण्यात आले. दुसऱ्या दिवशी  टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादिका  इंदरदीप कौर नंदा उपस्थित होत्या. तर या कार्यक्रमाची  सांगता मानव संसाधन विभाग प्रमुख मिलिंद मुतालिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी ताथवडे  शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ.पी. पी. विटकर, संकुलाचे सहसंचालक  डॉ. सुधीर भिलारे, प्रशासन प्रमुख  रवी सावंत,  नियोजन व विकास अधिकारी, जे एस पी एम विद्यापीठाचे अध्यक्ष  रवी जोशी, जे. एस. पी. एम. शाळेच्या सहसंचालिका अमिता कामत, प्राचार्या स्वाती आरू, उपमुख्याध्यापिका दीपा पवार व  अमित बाबर, वैदेही सामनेरकर, केतकी भिसे आदी  उपस्थित होते.

Chinchwad : आगामी काळात आपली लढाई आपल्याच लोकांसोबत

‘सृजन- द क्रिएशन’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी (Tathavade)  तीनही दिवस बहारदार कार्यक्रम सादर केले.   पहिल्या दिवशी ‘पूर्व -प्राथमिक’ विभागाने आपल्या चिमुकल्यांचे कलागुण अत्यंत देखण्या पद्धतीने सादर केले. यावेळी लेफ्टनंट कर्नल पी. एस. रणावत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना देशभक्ती व सैन्याचे महत्त्व सांगितले. त्यानंतर प्राचार्या स्वाती आरू यांनी शाळेच्या कार्य अहवालाचे वाचन केले. विद्यार्थ्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायनाने सगळ्या प्रेक्षकांना तीनही दिवस माना डोलवायला भाग पाडल्या.

बालगोपालांचे नृत्य, नाटक यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी   ‘प्राथमिक विभागाने’  विविध राज्यातील प्रथा, परंपरा,  प्राचीन ते आधुनिक असा प्रवास, तसेच ‘गंगा नदीचे धरतीवर आगमन’ या कार्यक्रमाने तर सगळ्यांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  प्रत्येक कार्यक्रमातून एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. गणेश वंदनेने कार्यक्रमाची बहारदार सुरुवात झाली.

‘टाकाऊतून नवनिर्मिती’ यावर आधारित ‘फॅशन शो’  या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची कल्पकता बघून प्रेक्षकांनी कौतुक केले. ‘ अवयव दान व अक्षमता ते सक्षमता ‘ याद्वारे प्रेक्षकांसमोर एक नवीन विचार मांडण्यात आला. ‘माझी शाळा’ या कार्यक्रमाने तर सगळ्यांनाच आपले शाळकरी दिवस आठवले . ‘सृजन- द –क्रिएशन’ या संकल्पनेद्वारे समाजासमोर शाळेने एक नवा विचार अत्यंत समर्थपणे मांडला. उत्कृष्ठ सूत्रसंचालन आणि संकल्पनेवर आधारित रांगोळ्या हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाचे पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  दीपा पवार यांनी (Tathavade)  केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.