Chinchwad : आगामी काळात आपली लढाई आपल्याच लोकांसोबत

राष्ट्रवादी (अजित पवार गट) कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांचे पदाधिकाऱ्यांना संबोधन

एमपीसी न्यूज – आगामी काळात होणाऱ्या (Chinchwad) निवडणुकांमध्ये आपली लढाई ही आपल्याच लोकांसोबत असणार आहे. त्यामुळे पक्षाची आणि ज्येष्ठ नेत्यांची भूमिका काय आहे, शहर विकासाचे व्हिजन काय आहे, या बाबी नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. असे मत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (अजित पवार गट) पिंपरी-चिंचवड शहराची जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शहर राष्ट्रवादी युवकच्या नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना रविवारी (दि. 24) नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरज चव्हाण बोलत होते.

सुरज चव्हाण म्हणाले, “अजित दादांनी विचारसरणी सोडली अशी टीका केली जाते. पण सन 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्या विरोधात लढला. निवडणुकीनंतर त्याच शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा वरिष्ठांनी निर्णय घेतला. त्यावेळी वरिष्ठांची भूमिका सर्वांनी मान्य केली. आता अजित दादांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली तर त्यात वावगे काय आहे, असा सवाल उपस्थित करत प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन पक्षाची आणि नेत्यांची भूमिका पोहोचविण्याचे आवाहन केले. तसेच आगामी निवडणुकांमध्ये आपली लढाई आपल्याच लोकांसोबत आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

Akurdi : ख्रिसमसनिमित्त आकुर्डी-निगडी परिसरात भव्य रॅली

पद कशासाठी घेतोय याचा विचार सर्वप्रथम प्रत्येक पदाधिकाऱ्याने केला (Chinchwad)पाहिजे. पदासोबत जबाबदारी येते. प्रत्येक पदाची वेगवेगळी जबाबदारी असते. आपण घेतलेले पद लेटरहेड आणि व्हिजिटिंग कार्ड पुरते राहायला नको. तर त्या पदाचा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापर व्हायला हवा. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच पक्ष संघटना वाढविण्यासाठी देखील काम करणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहर हे अजित दादांचे शहर म्हणून राज्यात ओळखले जाते. राज्यात पक्ष म्हणून जात असताना पिंपरी चिंचवड शहराचा अजित दादांनी कसा विकास केला याचे उदाहरण आपण देतो, असे चव्हाण यांनी सांगितले.

प्रत्येकाने आपल्या वॉर्डातून कामाला सुरुवात करावी. ज्यांना पदे मिळाली आहेत, त्यांच्या कामाचा आढावा ठराविक कालावधीनंतर घेतला जाणार आहे. चांगले काम करणा-या पदाधिकाऱ्यांची पक्षाकडून योग्य दखल घेतली जाईल. पुढच्या एक महिन्याच्या आत बूथ बांधणी करण्याचेही टार्गेट सुरज चव्हाण यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिले.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहराला अजित दादांचे शहर म्हणून ओळखले जाते. आगामी काळामध्ये आपण सगळ्यांनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दादांच्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन गव्हाणे यांनी (Chinchwad) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.