Akurdi : ख्रिसमसनिमित्त आकुर्डी-निगडी परिसरात भव्य रॅली

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील सेंट जोसेफ चर्चच्यावतीने (Akurdi) ख्रिसमसच्या निमित्ताने सांता क्लॉजच्या वेशभूषेत आकुर्डी-निगडी परिसरात भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती . फादर सिंटो चालीसेरी, समन्वयक  ॲड. के एम रॉय यांच्या पुढाकाराने सांताक्लॉजच्या वेशभूषेत फेरीतील चर्चच्या सदस्यांकडून नागरीकांना चॉकलेट व केकचे वाटप करण्यात आले.

Chinchwad : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पिंपरी-चिंचवड शहराची जंबो कार्यकारणी जाहीर

या फेरीची सुरुवात आकुर्डी चर्चपासून करण्यात झाली. मुंबई पुणे महामार्ग काळभोर नगर, चिंचवड स्टेशन, चाफेकर चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन, भेळ चौक, निगडी बस स्थानक, भक्ती शक्ती, साने चौक, थर्मैक्स चौक ऐश्वर्यम सोसायटी शुभश्री सोसायटी या मार्गे चर्चमध्ये फेरी सांगता झाली.

चर्चचे इमॅन्युएल व्ही सी,जयसन स्करिया, टीव्ही जोस  यांच्यासह सुमारे  दीडशे  कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुचाकी व चार चाकी वाहनांचा ताफा, जिंगल्स बेल्स गाणे वाजवत चौका चौकातून  150 केक आणि 7 हजार चॉकलेट वाटप करण्यात (Akurdi)  आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.