Pimple Saudagar : भारत-ऑस्ट्रेलिया लाईव्ह सामना 400 स्क्वेर फुट स्क्रीनवर पाहण्याची संधी

एमपीसी न्यूज – विश्वचषक 2023 क्रिकेट स्पर्धेचा (Pimple Saudagar) अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल संकुलात दि.19 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी खेळला जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्क्रीनिंग दुपारी 4 वाजता भव्य अशा 400 स्क्वेर फुट एलईडी स्क्रीनवर पाहण्याची संधी ‘पिंपळे सौदागर स्पोर्ट्स अँड कल्चरल ऑर्गनायझेशनने’ (PLESCO) उपलब्ध करून दिली आहे. पिंपळे सौदागर येथील महापालिकेच्या बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर सुमारे 2 एकर पेक्षा अधिक जागेत या शोचे आयोजन करण्यात आले आहे.

सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सोयी सुविधा

पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्लेस्कोच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या क्रीडांगणाच्या पृष्ठभागावर ग्रीन कार्पेट असल्याने प्रेक्षकांना मैदानात जाऊन सामना पाहत असल्याचा अनुभव घेता येणार आहे.

येथे सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या बैठकीसाठी सुसज्ज अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षकांसाठी पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. भारतीय संघाला प्रोत्साहन देत सामन्याचा आनंद घेण्यासाठी गालावर भारतीय संघाचे व भारताचे  टॅटू काढून देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Pimpri : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा सत्कार

हा लाईव्ह स्क्रीनिंग शो सर्वांसाठी मोफत खुला असून लहान मुले, महिला, पुरुष यांच्यासह युवक युवतींनी भारतीय संघाला (Pimple Saudagar ) प्रोत्साहन देण्यासाठी या सामन्याचे लाईव्ह शो पाहण्यासाठी मोठ्या संख्यने यावे, असे आवाहन (PLESCO) प्लेस्कोचे संस्थापक अध्यक्ष उमेश काटे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.