Pimpri : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख (Pimpri) यांचा माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यंदाची 66 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे जिल्ह्यातील लोणीकंद – फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या मैदानावर पार पडली. या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब 2023 चा मानकरी ठरलेला गंगावेस तालमीचा पैलवान सिकंदर शेख यांनी काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी पैलवान सिकंदर शेख यांना काटे यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.

Mahalunge : 9 लाख रुपयांची डुकरे चोरणारी टोळी गजाआड, पिग मिट शॉप चालकासह पाच जण अटकेत

यावेळी वस्ताद अर्जुन काटे, पोपटराव जगताप, पैलवान किशोर नखाते ,पैलवान राकेश नखाते, किरण गुरव, प्रशांत पवार , (Pimpri ) हर्षद काटे, संग्राम चव्हाण , विशाल काळे, श्याम भोसले, शांताराम माने आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.