Bhosari News : भोसरी येथे स्मरणदिन निमित्त रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम 

एमपीसी न्यूज : आज 20 नोव्हेंबर रोजी रस्ते अपघातामध्ये बळी पडलेल्या नागरिकांचा स्मरणदिन निमित्त रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपावर घेण्यात आला. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड मधील मोटर वाहन निरीक्षक शरद देशमुख, अनिल वैरागडे, अभिजित वसगडे, तेजस्विनी कुलकर्णी, सुप्रिया जगताप  व सोनाली जाधव या प्रसंगी उपस्थित होते. 

तसेच पिंपरी-चिंचवड PUC ओनर्स असोसिएशन चे अध्यक्ष रमेश चव्हाण, सचिव राकेश सायकर, खजिनदार  सागर सावंत,  फिरोज तांबोळी, सुशील सरवदे, मनोज पवार, अविनाश मिश्रा, पाटील व सहकारी उपस्थित होते.

Karnak bridge : कर्नाक पूल पाडण्याचे काम पूर्ण

आज झालेल्या कार्यक्रमात वाहतुकीचे नियम पळण्याबद्दल पोलिस अधिकारी वर्गाने सर्वांना माहिती दिली तसेच ज्या दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट घालून वाहतूक नियमांचे (Bhosari News) पालन केले व चार चाकी वाहन चालकांनी सिट बेल्ट लाऊन नियम पाळले अश्या वाहन चालकांचा पोलिस अधिकाऱ्यांकडून गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

तसेच आज उपस्थित असलेल्या सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळायची प्रतिज्ञा घेण्यात आली. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश सायकर ह्यांनी केले प्रस्तावना सुशील सरवदे ह्यांनी केली तर संघटनेची माहिती रमेश चव्हाण ह्यांनी दिली व आभार प्रदर्शन राकेश सायकर ह्यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.