Pune Temperature : पुण्यात दोन दिवस राहणार थंडीचा कडाका कायम 

एमपीसी न्यूज – पुण्यात या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची आज सकाळी नोंद झाली. पुण्यात तापमापकातील पारा दहा अंशाच्या खाली गेला (Pune Temperature) असून आज सकाळी 9.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. थंडीचा हा कडाका दोन दिवस कायम राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

पुणे शहरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली उतरल्यामुळे शहर व परिसरात गारठा चांगला वाढला आहे. उद्या (सोमवारी) किमान तापमान अंशांच्या आसपास तर मंगळवारी मान तापमान 11 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असे पुणे वेधशाळेच्या दैनंदिन वार्तापत्रात म्हटले आहे.

Bhosari News : भोसरी येथे स्मरणदिन निमित्त रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम 

मंगळवार नंतर मात्र किमान तापमानात थोडी वाढ होईल, (Pune Temperature) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील किमान तापमान 13 ते 15 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.