Worldcup 2023 : इंग्लंडचा स्पर्धेतला चौथा पराभव; श्रीलंकेची आठ गड्यांनी मात

एमपीसी न्यूज-विश्वचषक अर्ध्यावर आला असताना या स्पर्धेतला रोमांच ( Worldcup 2023) दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच आश्चर्यकारक निकालही पाहायला मिळत आहेत. विश्वचषकापूर्वी या स्पर्धेच्या विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून पहिल्या तीन देशांमध्ये इंग्लंडच्या संघाची गणना केली जात होती. या संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यांना चार सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे  त्यांचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे.

बेंगलोर येथे इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज डेविड मला आणि बॅरस्ट्रो यांनी 45 धावांची सलामी दिली. अनुभवी मेथ्यूस ने डेव्हिड मलानला 28 धावांवर बाद केले. त्या पाठोपाठ बेरस्ट्रो हा देखील 30 धावा करून बाद झाला.

Pune : विनय अरहानाने ललित पाटीलला मैत्रिणीला भेटण्यासाठी दिला फ्लॅट

त्यानंतर एकापाठोपाठ एक असे इंग्लंडचे गडी बाद होत गेले. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक यांने 43 धावांची झुंज दिली, तथापि इंग्लंडचा संघ 156 धावांमध्ये गडगडला. श्रीलंकेच्या लाहिरू कुमाराने 3 गडी टिपले तर रजिता आणि मेथ्यूस यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या डावाची सुरुवातही खराब झाली. पहिल्या सहा षटकांमध्ये त्यांचे दोन गडी बाद झाले. तथापि, पथुम नीसंका 77 धावा आणि सदिरा समरविक्रमा 65 धावा यांनी श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. इंग्लंडने दिलेले 157 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात 25.4 षटकांत सहज पार ( Worldcup 2023)  केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.