Pune : जनहित याचिका मागील हेतू  महत्वाचा – प्रा. अविनाश कोल्हे

एमपीसी न्यूज – चुकीच्या मुद्द्यांवर जनहित याचिका दाखल केल्यास दंड ( Pune ) होवू शकतो. त्यामुळे अशा याचिकांचे गांभीर्य देखील टिकून आहे. याचिका मागील हेतू शुद्ध असणे महत्वाचे आहे, असेही प्रा. अविनाश कोल्हे यांनी सांगीतले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित संविधान अभ्यास वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला.  गुरुवार (दि.26) सायंकाळी सहा वाजता गांधी भवन,कोथरूड येथे हा अभ्यास वर्ग झाला.

या अभ्यास वर्गामध्ये ‘जनहित याचिका ‘ या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले .हा  सहावा अभ्यास वर्ग होता . दीपक मोहिते यांनी प्रा. कोल्हे यांचा सत्कार केला. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.

Pune Mahavitran : घाना देशाच्या वरिष्ठ विद्युत अधिकाऱ्यांची पुणे  महावितरण विभागाला भेट

प्रा. कोल्हे म्हणाले,’जनहित याचिका हा सक्रिय न्यायव्यवस्थेचा (ज्युडिशियल ॲक्टीव्हिजम) आविष्कार आहे. नागरिकांच्या मूलभूत आणि कायदेविषयक हक्कांचे रक्षण करण्याचे काम जनहित याचिकांद्वारे केले जाऊ शकते. नेहमी ची कोर्टकचेरीची प्रक्रीया जनहित याचिकांच्या संदर्भात लवचिक केली जाते.

या संकल्पनेची सुरवात अमेरिकेत झालेली असली तरी भारतात 1980 मध्ये जनहित याचिकांना सुरवात झाली. उच्च न्यायालयाला आलेली पत्रे, बातमी,तारा सुध्दा जनहित याचिका म्हणून दाखल होऊ शकतात.खासगी व्यक्ती,स्थानिक प्रशासन, राज्य शासन तसेच केंद्र सरकार विरूध्द अशा याचिका करता येतात.

दिल्लीतील प्रदूषण, भवरी देवीवरील अत्याचार,  बंधुआ मुक्ती मोर्चा,  अशा अनेक यशस्वी जनहित याचिकाची उदाहरणे ( Pune )  यावेळी त्यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.