Pune :पुणे रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल लिफ्ट अन रॅम्पने जोडणार; 10 कोटींचा होणार खर्च

एमपीसी न्यूज –  पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी ( Pune) विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत. स्थानकावर 12 मीटर लांबीचा पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज – एफओबी) बांधण्यात आला आहे. याला आता लिफ्ट आणि रॅम्पची जोड दिली जाणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी चांगली सोय उपलब्ध होणार आहे. यासाठी रेल्वेकडून 10.7 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

Babanrao Dhakane : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

पुणे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसह महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. स्थानकावर सद्यःस्थितीत तीन सरकते जिने आहेत. दिव्यांग अथवा ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअरवर बसवून घेऊन जाणे अवघड जाते. ही अडचण दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 12 मीटर लांबीच्या पादचारी पुलाला रॅम्प आणि लिफ्टने जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे ज्येष्ठ आणि दिव्यांग प्रवाशांना व्हीलचेअरचा वापर करून रॅम्पवरून घेऊन जाणे सोपे होईल. शिवाय प्रवाशांना प्रत्येक फलाटावर सहजरित्या जाता यावे, या करिता लिफ्टही बसविल्या जाणार आहेत. त्यासाठी जागेची निश्चिती झाली आहे. सद्यस्थितीत रॅम्प असलेला पादचारी पूल जुना असला तरी तो सुस्थितीत आहे. या पुलाचा वापर सर्वच प्रवाशांकडून केला जात आहे.
पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे म्हणाले, “पुणे रेल्वे स्थानकावर 12 मीटर लांबीचा पूल आहे. त्याला लिफ्ट आणि रॅम्पने जोडले जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने हा ( Pune) निर्णय घेतला आहे. यासाठी 10.7 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.