PCMC : वायू प्रदूषण रोखण्यासाठी ‘एअर बिन प्युरिफायर’, ‘मिस्ट फाऊंटन’ बसविणार

एमपीसी न्यूज –  गेल्या काही वर्षांपासून शहरातील ( PCMC) वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. हवा शुध्द होण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पुढाकार घेतला आहे. यामुळे महापालिकेच्या वतीने शहरात एअर बिन प्युरिफायर आणि मिस्ट फाऊंटन बसविण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये पहिले एअर बिन प्युरिफायर बसविण्यात आले आहे.

Pune : पुणे रेल्वे स्टेशनवरील जुना पादचारी पूल पाडणार, नवीन 12 मीटर रुंदीच्या पुलाला मान्यता

महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात 11 जानेवारी 2023 शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसविली होती. ती महिनाभरातच काळी पडली होती. त्यातून शहराची गुणवत्ता किती ढासळत आहे, हे सिद्ध झाले होते.

हवेमध्ये प्रदूषक कणांची पातळी वाढली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, दम लागणे आदींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. त्यातून बारीक कण हवेत मिसळत आहेत.

तसेच बांधकाम क्षेत्रातील धुळही वाढत आहे. परिणामी सध्या प्रदूषित हवेचा श्वास नागरिक घेत आहेत. याचाच विचार करुन पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने शहरातील महत्वाच्या चौकात एअर बिन प्युरिफायर बसविण्यात येणार आहेत.

त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये पहिले एअर बिन प्युरिफायर बसविण्यात आले आहे. ते लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या चौकात बसविणार एअर बिन प्युरिफायर

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भोसरी चौक, नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन, कस्पटे वस्ती, होळकर चौक, नेहरूनगर चौक, मोशी गोडाऊन चौक, चिंचवड (रांका गॅस स्टेशन) याठिकाणी तर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आकुर्डी खंडोबा चौक, नाशिक फाटा, नेहरूनगर चौक, चिखली आरटीओ चौक, चिंचवडगाव चौक, रावेत-भोंडवे चौक, कोकणे चौक, तळवडे चौक, एमएए स्कूल चौक या चौकात मिस्ट फाऊंटन बसविण्यात येणार ( PCMC) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.