Pimpri : धुमस्टाईलने दुचाकीवरून सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन सराईतांना अटक, पाच गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून वेगात येऊन धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील (Pimpri )  सोनसाखळी चोरणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड़ पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट 5 च्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.

विसाम राकेश नानावत ( वय 20 रा. कंजारभट, मावळ) बिश्रांत राकेश नानावत (वय 22 रा. कंजारभट रा.मावळ)  अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार आकाश वजीर राठोड (रा. मुलखेड,लवळे फाटा, ता.मुळशी) हा फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे दुचाकीवरून येवून महिलांच्या गळ्यातील (Pimpri )  सोनसाखळी हिसकावून नेत होते. याप्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.

PCMC : वायू प्रदूषण रोखण्यासाठी ‘एअर बिन प्युरिफायर’, ‘मिस्ट फाऊंटन’ बसविणार

या कारवाईत पोलिसांनी आरोपी यांचेकडुन एकुण 66.56 गॅम वजनाच्या 5 सोन्याच्या चैन/मंगळसूत्र, गुन्ह्यात वापरलेली 1 काळ्या रंगाची होंडा शाईन मोटार सायकल व एक मोबाईल असा एकूण 2 लाख 97 हजार 020 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दोन, देहुरोड पोलीस स्टेशन येथे दोन व दिघी येथे एक असे पाच गुन्हे या तापासात उघड झाले आहेत. या गुन्ह्राचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कोळी गुन्हे शाखा युनिट-5 हे करीत असुन पाहीजे आरोपी नामे आकाश राठोड याचा शोध चालू आहे.

या गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश राठोड हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. तळेगाव पोलीस ठाणे येथे दोन, रावेत येथे दोन, हिंजवडी येथे पाच, कामशेत पोलीस ठाणे ,चिंचवड पोलीस ठाणे, पिंपरी पोलीस ठाणे, चिखली पोलीस ठाणे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, सासवड पोलीस ठाणे, सुपा पोलीस ठाणे येथे प्रत्येकी एक गुन्हे दाखल (Pimpri ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.