Pune : विनय अरहानाने ललित पाटीलला मैत्रिणीला भेटण्यासाठी दिला फ्लॅट

ललित पाटील याला मदत केल्याप्रकरणी विनय अरहानाला चार दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रग्ज तस्कर ( Pune) ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर आता या प्रकरणात रोज वेगवेगळे कारनामे उघडकीस येत आहेत. पुणे पोलिसांनी या प्रकरणी पुण्यातील एका संस्थेचा चालक असलेल्या विनय अरहना याला अटक केली.
विनय अरहना याने ललित पाटील याला मैत्रिणीला भेटण्यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला आपला फ्लॅट उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. ललित पाटील याला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी विनयला अटक केली आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी बंद गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू असताना ललित पाटील याला पळून जाण्यासाठी विनय अरहानाचा वाहन चालक दत्ता डोकेने पळून जाण्यात मदत केल्याचे समोर आले होते.

तर डोकेने त्याला पैसे देखील पुरवले होते. डोके याने हे सर्व अरहाना याच्या सांगण्यावरून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी अरहाना याला या गुन्ह्यात ताब्यात घेतले.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला फ्लॅट विनय अरहाना याने ललित पाटील आणि त्याच्या त्या मैत्रिणीला भेटण्यासाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती आता समोर आली आहे.
 त्यामुळे रुग्णालयात असतानाही ललित त्या फ्लॅटवर कसा गेला? यासाठी त्याला कोणी कोणी मदत केली? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.