Punavale : कचरा डेपोची जागा डिसेंबर अखेर महापालिकेच्या ताब्यात येणार

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वतीने कचरा डेपोसाठी आरक्षित (Punavale) पुनावळे येथील 23 हेक्‍टर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. त्या जागेच्या बदल्यात वन विभागास चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा शेजारील 23 हेक्‍टर खासगी जमीन खरेदी करुन दिली जाणार असून त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर कचरा डेपोची जागा डिसेंबरअखेर महापालिकेच्या ताब्यात येईल असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात दररोज 1200 टन ओला आणि सुका कचरा जमा (Punavale) होतो. हा कचरा संकलित करुन मोशीतील 81 एकर परिसरातील कचरा डेपोत टाकला जातो. ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण केले जात असून सुका कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू केला आहे.

Maharashtra : जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जाते. मोशीतील डेपोत 1991 पासून कचरा टाकला जातो.  तिथे कचऱ्याच्या ढिगाचे डोंगर झाले आहेत. या डेपोची क्षमता संपुष्टात येऊ लागली आहे.

नागरिकरण झपाट्याने वाढत असल्याने भविष्याची गरज ओळखून महापालिकेकडून  2008 मध्ये पुनावळेतील वन विभागाची 23 हेक्टर जागा घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, महापालिकेला अद्याप जागा ताब्यात घेण्यास यश आलेले नाही.

त्याबदल्यात मुळशीतील पिंपरी येथे वन विभागाला महापालिका पर्यायी जागा देणार होती. मात्र, या ठिकाणी मुरूम असल्याने (Punavale) वन विभागाने या जागेचा पर्याय नाकारला.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा शेजारील खासगी जमीन वन विभागाने सुचविली. तेथील सुमारे 23 हेक्‍टर जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया महापालिकेने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू केली आहे.

जागा मोजणीसाठी महापालिकेने पाच लाख 34 हजार रूपये भरले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्या जमिनीपोटी महापालिका दहा कोटी रुपये देणार आहे. जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण होताच पुनावाळेतील जागा ताब्यात घेतली जाणार आहे.

त्या जागेवर कचरा डेपो उभारला जाईल. अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून कच-यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे तिथे कच-याचे ढिग उभारणार नाहीत असा विश्वास आयुक्त सिंह यांनी (Punavale) व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.