Worldcup 2023 : दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर 149 धावांनी विजय 

एमपीसी न्यूज- मुंबई येथील वानखेडे मैदानावर (Worldcup 2023) आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डी कॉक याने केलेल्या धडाकेबाज 172 धावा मार्करम 60 धावा आणि क्लासेन 90 धावा यांनी केलेल्या दमदार फलंदाजीचा जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेश समोर 383 धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ सर्वबाद 233 धावांमध्ये गडगडला.

Pune : आज झोमॅटो, स्विगीचे पार्सल मिळणार नाही ; ओला व उबेर देखील राहतील बंद

बांगलादेश कडून अनुभवी खेळाडू मोहम्मदुल्लाह याने 111 धावांची शतकी खेळी केली. तथापि त्याला बांगलादेशच्या कोणत्याही खेळाडूची साथ मिळाली नाही आफ्रिकेकडून गेराॅल्ड कॉटझी याने 3 बळी घेतले तर जानसन, विलियम्स आणि रबाडा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.क्विंटन डी कॉक सामनावीराचा मानकरी ठरला.

 या विजयासह दक्षिण आफ्रिका पॉईंट्स टेबल मध्ये दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. पहिल्या क्रमांकावर भारत असून बांगलादेश हा पॉईंट्स टेबल मध्ये सर्वात तळात म्हणजेच दहाव्या क्रमांकावर (Worldcup 2023) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.