Chikhali : चिखली औद्योगिक परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईताला उत्तर प्रदेश येथून अटक

एमपीसी न्यूज – चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक (Chikhali ) वर्कशॉप, स्क्रॅब दुकान, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय आहेत. येथे स्क्रॅपचा माल चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना चिखली पोलिसांनी सराईताला उत्तरप्रदेश येथील बस्ती जिल्ह्यातून अटक केली आहे.

संजय रामप्रसाद राणावत ( वय 32 रा. मुळगांव- माझा मानपुर, जि. बस्ती राजा उत्तरप्रदेश, सध्या चिखली पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.याबरोबरच त्याचे साथीदार सनी विनोद गौड (वय 21 रा. भसोरी) जमशेर इकबाल चौधरी (वय 46 वर्षे, सध्या रा.कोंडवा, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजि रहिमान उबैदुल्ला खान यांनी फिर्याद दिली होती की, चिखलीतील वर्मा इंडस्ट्रीज या शॉपमध्ये घुसून त्यांना मारहाण करून त्याचे शॉपमध्ये ठेवलेला दीड लाख रुपये किंमतीचा 200 किलो वजनाचा, कार्बाईड इनसर्ट या नावाचा स्क्रॅब माल घरफोडी करून चोरून नेला होता.

यातील फिर्यादी यांचे दुकानातून यापूर्वी देखील कार्बाईट इनसर्टचा स्वीच, 467 किलो वजनाचा साडे तीन लाख (Chikhali )  रुपये किमतीचा माल चोरीस गेला होता त्याबाबत चिखली पोलीस स्टेशन  गुन्हे दाखल होते.

Worldcup 2023 : दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर 149 धावांनी विजय 

या गुन्हायांचा तपास करत असताना दोन्ही गुन्हे हे सराईत आरोपीनीच केले असण्याची दाट शक्यता होती. पोलिसांनी परीसरातील 20-22 ठिकाणची सिसिटिव्ही फुटेज चेक केली असता त्याना या गुन्हयातील एक आरोपी हा सनी विनोद गौड हा असल्याचे व त्याने त्याचे इतर साथीदाराचे मदतीने तो घरफोड्या व जबरी चो-या केल्याचे त्याचे तपासात समोर आले.

त्यानुसार तपास करुन आरोपी संजय राणावत याचे मोबाइल फोन नंबरचे तांत्रीक विश्लेषण केले असता आरोपी संजय राणावत हा उत्तरप्रदेश याठिकाणी असल्याचे लोकेशन प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे चिखली पोलिसांचे एक पथक उत्तरप्रदेश येथे रवाना केले.

संजय रानावत याला अटक केली. त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने कार्बाईट इनसर्टया साल हा त्याचे मित्र सनी गौड यानी मिळून चोरलेला असल्याचे सांगुन हा माल जमशेर इक्बाल चौधरी, याच्या मार्फत औरंगाबाद या ठिकाणी विकला असल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे टिमने औरंगाबाद या ठिकाणी जावून गुन्हयातील 367 किलो वजनाचे 2 लाख 75 हजार 53 रुपये किंमतीचे कार्बाईड इनसर्ट स्क्रॅब मटेरियल जप्त केला.तर आरोपी सनी गौड याने सांगितल्याप्रमाणे पिंपरी पुणे या ठिकाणाहून 22 हजार 483 रुपये किमतीचे 20 किलो, कार्बाइड इनसर्ट स्क्रब मटेरियल जप्त करण्यात आले आहे.

ही कामगीरी चिखली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद,पोलीस उपनिरीक्षक  अमरदीप पुजारी, पोलीस हवालदार गजे, सावंत, पांडव, नांगरे, तारळकर, साकोरे, मानेकर, शिंदे, मासाळ, मोहिते, पोलीस नाऊक कांबळे, राठोड, पिंजारी पोलीस शिपाई सकपाळ, भोरे नाईक यांनी (Chikhali ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.