Pune : आज झोमॅटो, स्विगीचे पार्सल मिळणार नाही ; ओला व उबेर देखील राहतील बंद

एमपीसी न्यूज – आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ( Pune) ओला,  उबेर,  स्वीगी,  झोमॅटो,  पोर्टल,  अर्बन कंपनी यासारख्या मोबाईल ॲप साठी काम करणारे डिलीव्हरी बॉय एक दिवसाचा बंद पाळणार आहेत. त्यामुळे ओला,  उबेरच्या माध्यमातून चालणाऱ्या कार, टु व्हीलरवरून होणारी स्वीगी आणि झोमॅटोची डिलिव्हरी  पुण्यात बंद राहणार आहेत. 

Alandi : झेंडूच्या फुलांची विक्री न झाल्याने फुले रस्त्यावर

या कंपन्यांकडून होणारी कामगारांची पिळवणूक थांबावी यासाठी राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील गिग कामगार नोंदणी व कल्याणकारी कायदा लागू करावा यासाठी हा बंद पाळण्यात येणार आहे. इंडियन गिग वर्कर्स फ्रंट या संघटनेतर्फे या बंदचे आयोजन करण्यात आले ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.