Alandi : झेंडूच्या फुलांची विक्री न झाल्याने फुले रस्त्यावर

यावर्षी मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव कवडीमोल ठरला

एमपीसी न्यूज – दसऱ्या निमित्त काल (दि.24 रोजी)  झेंडूच्या फुलांची (Alandi )  शहरात मोठ्या प्रमाणात आवक झाली होती.आळंदी शहरात फुटपाथवर अनेक विक्रेते मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले घेऊन विक्री करताना दिसून येत होते. काल सकाळी झेंडूच्या फुलांचा दर 30 रु .किलो असा होता तर दुपार पर्यंत त्याचा भाव 10 रु .किलो पर्यंत झालेला दिसून आला.

दसऱ्या निमित्त झेंडूची फुले  मोठ्या प्रमाणत बाजारात आल्याने त्याचा भाव यावर्षी कवडीमोल ठरला आहे. 30  रु .ते 10 रु. असा भाव असूनही त्या फुलांची विक्री न झाल्याने विक्रेत्यांनी ती फुले  तशीच फुटपाथवर ,रस्त्यावर टाकून दिल्याचे चित्र काल रात्री पासून  आज सकाळपर्यंत दिसून (Alandi ) येत होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.