Alandi : श्री खंडोबा मंदीर परिसरात मोठ्या उत्साहात सीमोल्लंघन

एमपीसी न्यूज – काल ( दि.24 रोजी)  विजया दशमी निमित्त आळंदी येथील (Alandi) खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघनासाठी माऊलींच्या पालखीचे  सायंकाळी 6 वाजता आगमन झाले.त्यानंतर श्रीराम,श्री नृसिंह स्वामी व श्री भैरवनाथ पालखीचे आगमन झाले. सायंकाळी साडे सहा दरम्यान आपट्यांच्या पानांचे पूजन झाले. यावेळी देवस्थान विश्वस्त विकास ढगे पाटील,देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व पालखीचे मानकरी ,सेवेकरी ,ग्रामस्थ उपस्थित होते.

 

आलेल्या सर्व पालख्यांसमोर वारकरी,ग्रामस्थ  यांचे भजन झाले. श्री खंडोबा व पालखी दर्शनासाठी भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. भजन झाल्यानंतर  पालखीने खंडोबा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करत आपल्या मंदिरस्थळाकडे प्रस्थान केले. यावेळी दसऱ्यानिमित्त नागरिकांनी एकमेकांना आपट्यांची पाने देत  शुभेच्छा दिल्या.

Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट, आठ मुले भाजून गंभीर जखमी

ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिराचा  गाभारा व सभागृह झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पालखीच्या सोई सुविधांसाठी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान तर्फे भव्य मंडप बांधण्यात आला होता.

या कार्यक्रमाला श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान,आळंदी नगरपरिषद,आळंदी पोलीस स्टेश (Alandi)  नयांचे विशेष सहकार्य लाभले.समस्त आळंदी ग्रामस्थांच्या सौजन्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.