Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट, आठ मुले भाजून गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – दुर्गादिवीच्या मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ( Mahabaleshwar ) असलेल्या जनरेटरच्या पाईपचा भीषण स्फोट झाल्याची घटना महाबळेश्वर येथे मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत आठ मुले आणि मुली भाजून गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pimpri : शहरात प्रतीकात्मक रावण दहन करून विजयादशमी उत्साहात साजरी; ढोल ताशा आणि डीजेच्या गजरात दुर्गा मातेला निरोप

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वरातील दुर्गा उत्सव समितीची  दुर्गा देवीची विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणूक कोळी आळीमध्ये  आली असताना जनरेटरची पेट्रोलचा पाईपला गळती लागली आणि जनरेटरने पेट घेतला. या आगीत दुर्गा देवीच्या मूर्तिजवळ बसलेली चार ते सात वयोगटातील सात ते आठ मुले भाजली आहेत.

सर्व जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी सातारा येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर असणाऱ्या तीन मुलांना पुण्याला हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, घटनेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा अपघाता नेमका कसा घडला? याचा तपास सुरू केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.